प्रतिनिधी / इस्लामपूर
इस्लामपूर येथील सांगली-पेठ रस्त्यावरील वेल्डींग कामाचे ६० रुपये देण्याच्या कारणावरुन वेल्डींग व्यावसायीकासह मारहाण झाली. याच्यात वेल्डींग व्यावसायीकासह त्याच्यावर मेहुण्यावर चौघांनी कात्रीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात अंकुश शेखर गवळी(२९,रा नालबंद कॉलनी,हनुमाननगर इस्लामपूर) व अभिजीत नागेश गवळी अशी जखमी झाले.
तर संशयीत आरोपी चरण विलास धुमाळे, विनोद विलास घुमाळे(दोघे रा.कापूसखेड)यांच्यासह अनोळखी दोन संशयीत आरोपींचा यामध्ये समावेशआहे.अंकुश गवळी यांचे श्रीराम गॅस वेल्डींग नावाचे दुकान आहे.रविवारी विनोद धुमाळे व चरण हे वायसर वेल्डिंग करण्यासाठी गवळी यांच्या दुकानात आले. वेल्डींग केल्यानंतर गवळी यांनी कामाची मजूरी ६० रुपये मागितली.
त्यावेळी वाद घालून, शिवीगाळ करुन या दोघांनी अंगावर धावून जावून जीवे मारण्याची धमकी दिली. पैसे न देताच, ते दुचाकीवरुन निघून गेले. त्या नंतर पुन्हा दोन सहकाऱ्यांसह टेम्पो ट्रॅव्हलरने चौघे परत येत गवळी यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.