24 जूनपासून सोनी लिववर होणार स्ट्रीम
सोनी लिववर लवकरच प्रसारित होणारी वेबसीरिज अवरोध सीझन 2 चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. याचा पहिला सीझन राहुल सिंह आणि शिव अरुर यांचे प्रसिद्ध पुस्तक इंडियाज मोस्ट फियरलेसच्या पहिल्या भागावर आधारित होता. तर सीझन 2 पुस्तकातील अध्याय 9 वर आधारित आहे. सीरिजच्या नव्या सीझनमध्ये बंगाली अभिनेता अबीर चॅटर्जी मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिवने स्वतःच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून अवरोध सीझन 2 चा ट्रेलर शेअर केला आहे. ‘शत्रूने अंतिम घेरावची योजना आखली होती, परंतु आमच्या शूरांसाठी योजना आखली नव्हती’ असे कॅप्शनमध्ये म्हटले गेले आहे. ही सीरिज 24 जूनपासून स्ट्रीम होणार आहे. सोनी लिववर अवरोध 2 च्या स्ट्रीमिंगची मी प्रतीक्षा करत आहे. अशाप्रकारच्या लोकप्रिय सीरिजमध्ये काम करण्याचा अनुभव अद्भूत होता. हिंदी सीरिजमध्ये पदार्पणासाठी याहून अधिक चांगला पर्याय मिळू शकत नव्हता. या सीरिजद्वारे लोकांना रोमांच, ऍक्शन आणि मनोरंजनाचा डबल डोस मिळणार असल्याचे अबीरने म्हटले आहे.