ऑनलाईन टीम / पुणे :
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची पुण्यातील 4 कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. मागील महिन्यापासूनच अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित ईडीच्या रडारवर होते.
पुणे येथील सरकारी जमिनीवर भोसले यांनी बांधकाम केले आहे. या जमिनीबाबत पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ईडीने मागील महिन्यात भोसले पिता-पुत्राला चौकशीसाठी बोलावले होते. त्यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. अखेर भोसले यांची पुण्यातील अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ही संपत्ती 4 कोटींची आहे.
ईडीने आतापर्यंत अविनाश भोसले यांची पुणे आणि नागपुरातील 40 कोटी 34 लाख रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.