वार्ताहर /केपे
केपे पोलिसांनी अवेडे, केपे येथे सुमारे 4 लाख 78 हजार रु. किमतीची अवैध दारू जप्त केली आहे. राज्यात निवडणूक आचारसाहिता लागू झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी दोन वेळा छापे मारून दारू जप्त करण्यात आली होती. आता अवेडे येथे दारू जप्त करण्यात आली असून केपे पोलिसांनी पुढच्या तपासाकरिता साठा केपे अबकारी विभागाकडे सुपूर्द केला आहे. ही कारवाई केपे निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.