प्रतिनिधी/ कारवार
गोव्यातून कारवार जिल्हय़ात अवैधरीत्या वाहतूक करताना जप्त करण्यात आलेली सुमारे 22 लाख रुपये किमतीची दारू जमिनीवर ओतून नष्ट करण्यात आली. कारवारचे तहसीलदार के. व्ही. कट्टी यांच्या उपस्थितीत अबकारी खात्याच्या अधिकाऱयांनी चोरटय़ा दारूची विल्हेवाट कर्नाटक आणि गोवा राज्यांच्या सीमेवरील कारवार तालुक्मयातील माजाळी येथील अबकारी शोध ठाण्याजवळच्या वनप्रदेशात लावण्यात आली.
गेल्या एक वर्षात वेगवेगळय़ा 85 प्रकरणात सुमारे 22 लाख रुपये किमतीची चोरटी दारू जप्त करण्यात आली होती. नष्ट करण्यात आलेल्या दारूमध्ये तीन हजार 320 लिटर भारतीय बनावटीच्या दारूचा, 3 हजार 338 लिटर गोवा फेणीचा आणि 630 लिटर बीयर बाटल्यांचा समावेश होता.
यावेळी अबकारी खात्याचे उपायुक्त वाय. आर. मोहन आणि अबकारी खात्याचे अन्य कर्मचारी उपस्थित होते..