साडे चार हजार रोकडीसह अडीच हजांची दारु जप्त
प्रतिनिधी /सातारा
सातारा जिह्यात पोलिसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी जुगार अड्डय़ांवर छापा टाकून पोलिसांनी सुमारे साडेचार हजार रूपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले. तीन ठिकाणी देशी-विदेशी दारू अड्डय़ांवर छापा टाकून पोलिसांनी 2 हजार 88 रूपयांच्या 38 दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत गजवडी (ता. सातारा) येथील धनवडी फाटा येथील बसस्टॉपच्या पाठीमागे आडोशाला विशाल राजन गोरे (वय 26, रा. शुक्रवार पेठ, सातारा) याच्याकडून 532 रूपये व जुगाराचे साहित्य जप्त केले.
तर सातारा शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत खेड (ता. सातारा) गावच्या हद्दीत साई मोबाईल शॉप परिसरात नितीन बजरंग करे (वय 24, रा. वाढे), समीर सलीम कच्छी (रा. मोळाचा ओढा, सातारा) यांच्याकडून 3 हजार 20 रूपये रोख रक्कम व जुगारचे साहित्य जप्त केले. तर वाई पोलिसांनी केलेल्या कारवाईत वाई (ता.वाई) येथील पी.आर. चौकात पानटपरीच्या आडोशाला सागर शिवलिंग कोळी (वय 25, रा. सिध्दनाथ वाडी, ता.वाई) याच्याकडून 815 रूपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले. जिहे (ता.सातारा) येथे कोहिनूर चिकन शॉपच्या पाठीमागे तेथीलच अल्लाउद्दीन रमजान शेख याच्याकडून 624 रूपयांच्या 12 देशी-विदेशी दारूच्या बाटल्या, शेंद्रे (ता. सातारा) येथे शिवाजी केशव जावळे (वय 60, रा. वेचले, ता.सातारा) याच्याकडून 624 रूपयांच्या 12 दारूच्या बाटल्या, उपळवे (ता.फलटण) येथील धोम बलकवडी कॅनॉलच्या शेजारी तेथीलच भाऊसो मारूती चव्हाण (वय 25) याच्याकडून 840 रूपयांच्या 14 देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या.