कुडाळ तालुका मनसेचे पोलिसांना निवेदन
प्रतिनिधी / कुडाळ:
कुडाळ तालुक्मयातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्यासंबंधी मनसेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर केले.
या निवेदनात, कुडाळ तालुक्मयात जुगार, मटका व गावठी दारुसह गोवा बनावटीची दारू विकणे आदी अवैध व्यवसाय अलीकडच्या काळात वाढू लागले आहेत. या अवैध धंद्यांना आळा बसविण्यास पोलीस प्रशासन नक्कीच सक्षम आहे. परंतु, त्यासाठी ठाम निर्धार व प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे. या आधी पोलीस प्रशासनाने याबाबतीत अनेकवेळा कारवाई केलेली आहे. मात्र, या अवैध धंद्यांवर कायमचा आळा बसत नाही, ही शोकांतिका आहे. त्यामुळे अवैध धंदे करणाऱयांचे जणू माफियाराज बोकाळले आहे, असे चित्र कुडाळ तालुक्मयात दिसून येत आहे. या बेकायदेशीर धंद्यांबाबत सामान्य माणसाची विरोधात बोलण्याची हिंमत होत नाही. त्यामुळे संबंधित व्यावसायिक कुणाचीही तमा न बाळगता शासनाला अगदी गृहीत धरून राजरोसपणे काळे धंदे करीत आहेत. अलीकडील आंबोली येथील महिला घातपात प्रकरण यासह जिल्हय़ात अशी अनेक उदाहरणे आहेत. यामागील प्रमुख कारणे अवैध धंदे, नशा आदी घटक आहेत. शिवाय संबंधित गुन्हेगारही याच धंद्यांशी निगडीत आहेत. एकूणच तालुक्मयातील तरुण पिढी वाममार्गाला लागून बरबाद होत आहे, असे चित्र आहे. त्यामुळे अनैतिक धंद्यांचे मूळ उखडून काढण्याची गरज आहे. तालुक्मयातील अवैध धंद्यांवर कारवाईची धडक मोहीम हाती घेऊन कायमस्वरुपी आळा बसवावा. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गावोगावचे सर्व कार्यकर्ते या अवैध धंद्यांचे प्रकार, ठिकाणे व सविस्तर माहिती पोलीस प्रशासनाला पुरवून या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवतील, असे म्हटले आहे.
मनसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, तालुका सचिव राजेश टंगसाळी, मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे, उपतालुकाध्यक्ष दीपक गावडे, कुडाळ शहर उपाध्यक्ष वैभव परब, शहर सचिव रमाकांत नाईक, विभाग अध्यक्ष सुंदर गावडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.