मालवण तहसीलदार यांची आचरा येथे धडक कारवाई
आचरा / प्रतिनिधी:
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यां 2 डपंरवर मालवण तहसीलदार यांच्या भरारी पथकाने गुरुवारी दुपारी आचरा येथे कारवाई केली. कारवाईत जप्त केलेले सदर डपंर आचरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. मालवण तहसीलदार यांचे भरारी पथक फिरत असताना आचरा मालवण रस्त्यावर हे डपंर विनापास वाळूवाहतुक करताना मालवण तहसीलदार अजय पाटणे यांना आढळुन आले असता ही कारवाई करण्यात आली. गुरुवारी दुपारी मालवण तहसीलदार अजय पाटणे यांचे भरारी पथक फिरत असताना ही कारवाई करण्यात आली यावेळी त्यांच्या समवेत अव्वल कारकून दिनेश सावंत, तलाठी अनिल काळे, योगेश माळी, कोतवाल गिरीश घाडी कारवाईत सहभागी झाले होते.