मुंबई
अव्हेन्यू सुपरमार्टचा समभाग सोमवारी 2 टक्के इतका तेजीसह व्यवहार करत होता. दरम्यान कंपनीच्या 30 जुनला संपलेल्या तिमाहीत महसुलात 31 टक्के इतकी वाढ झाली असल्याची माहिती आहे. एप्रिल- जून कालावधीत कंपनीने 3833 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. या महसूलवाढीच्या निकालानंतर कंपनीचा समभाग शेअर बाजारात 2.5 टक्के वाढीसह व्यवहार करत होता. गेले दोन दिवस हा समभाग घसरणीत होता. त्यामुळे गुंतवणूकदार बुचकळय़ात पडले होते. पण सोमवारी तिमाही निकालानंतर बाजारात समभाग तेजीसह व्यवहार करत होता. सोमवारी 3384 रुपयांवर कंपनीचा समभाग होता. बीएसईत कंपनीचे बाजार भांडवल 2.17 कोटी रुपयांनी वाढल्याचे दिसले. 30 जून 2021 पर्यंत अव्हेन्यूने भारतात 238 स्टोअर्स असल्याचे म्हटले आहे.