सलवार कमीझ हा प्रकार खूपच लोकप्रिय आहे. फॉर्मलपासून कॅज्युअलपर्यंत कोणत्याही प्रसंगी सलवार कमीझ घालता येते. सलवार कमीझमध्ये बरीच विविधता बघायला मिळते. हा पारंपरिक पेहराव कॅरी करताना या टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील.
* कमीझची उंची तुमच्या उंचीनुसार असायला हवी. खूप लांब किंवा खूप आखूड कमीझ शोभून दिसणार नाही. कमीझ तुमच्या गुडघ्यालगत यायला हवी. कमी उंचीच्या महिलांनी फार लांब कमीझ घालू नये.
* सलवार कमीझच्या कापडाची निवडही खूप महत्त्वाची आहे. पातळ कपडय़ांमध्ये तुम्ही बारीक दिसाल. तुम्ही खूप बारीक असाल तर जाडसर कापडाची निवड करा. बारीक महिलांनी कॉटन आणि शिफॉन टाळायला हवं.
* कमीझच्या बाह्यांकडेही लक्ष द्या. सध्या लांब बाह्यांची फॅशन आहे. हात किंवा दंड बारीक असतील तर बिन बाह्यांचे कमीझ घालायला हरकत नाही. तुमचे हात खूपच बारीक असतील तर फ्रिल्सवाल्या बाह्यांची निवड करायला हरकत नाही.
* रंगांची निवडही योग्य असायला हवी. स्थूल महिलांनी गडद रंगाची निवड करायला हवी. अशा रंगांमुळे तुम्ही थोडय़ा बारीक दिसू शकता. सावळ्या वर्णाच्या महिलांनी फिकट रंगाचे कपडे घालायला हवेत. गोर्या महिलांनी फिकट हिरवा, पिच, पिवळा, निळा किंवा चारकोल ग्रे अशा रंगांमध्ये प्रयोग करायला हरकत नाही.
* सलवार कमीझमध्ये बरीच विविधता पहायला मिळते. तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाला तसंच शरीरयष्टीला साजेशी फॅशन निवडायला हवी. एखादा प्रकार तुम्हाला शोभून दिसणार नाही. त्यामुळे वेगवेगळे प्रकार ट्राय करून तुम्हाला शोभणार्या स्टाईल कॅरी करा.