शिल्पाने भरला 10 तासांत 28 टन ऊस : सर्वत्र कौतुक
प्रतिनिधी /बेळगाव
दहा तासांत एका तरुणीने 28 टन ऊस ट्रक्टरमध्ये भरून आपणही काही कमी नाही, हे दाखवून दिले आहे. चिकोडी तालुक्मयातील जागनूर येथे तरुणीने केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शिल्पा राजू रातोड (वय 18) ही मूळची विजापूर तालुक्मयातील उत्नाळची. कुटुंबीयांसमवेत ऊस तोडण्यासाठी चिकोडी तालुक्मयात तिचे वास्तव्य आहे. काही तरी नवीन करून दाखवायच्या उमेदीने शिल्पाने प्रत्येकांना थक्क करणारी ही कामगिरी केली आहे.
रविवारी मध्यरात्री 2 वाजता शिल्पाने ट्रक्टरच्या ट्रॉलीमध्ये ऊस भरण्यास सुरुवात केली. 10 तासांत तिने 28 टन ऊस भरला. तिचा हा विक्रम पाहण्यासाठी उसाच्या मळय़ात गावकऱयांची गर्दी जमली होती. जागनूरकरांनी तिचे तोंडभरून कौतुक केले आहे.
हणमंत यल्लाप्पा हंजी यांच्या मालकीचा ऊस भरण्यात आला. मल्लाप्पा चन्नाप्पा हणमंतगोळ यांच्या ट्रक्टरमध्ये शिल्पाने 28 टन ऊस भरला. त्यानंतर उसाने भरलेला हा ट्रक्टर साईप्रिया कारखान्याला नेण्यात आला. ऊसतोडणी केल्यानंतर ट्रक्टरमध्ये भरण्यासाठी सारेच कामगार हातभार लावतात. मात्र विक्रम नोंदविण्यासाठी शिल्पाने एकटीने 28 टन ऊस भरला आहे.