दोस्तांनो, तुम्हाला माहितच असेल की, या पृथ्वीवर आगळय़ा वेगळय़ा ठिकाणांची कमतरता नाही. ही ठिकाणं बघितल्यावर आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. अशाच काही ठिकाणांची माहिती आज घेऊ या…
इजिप्त हा देश पिरॅमिडससाठी ओळखला जातो. पण आफ्रिका खंडातल्या सूदानमध्ये इजिप्तपेक्षा जास्त पिरॅमिड्स आहेत. इजिप्तमध्ये 118 पिरॅमिडस् आहेत तर सूदानमधल्या पिरॅमिड्सची संख्या 255 च्या घरात आहे.
‘माउंट ऑगस्टस’ नावाचं एक ठिकाण आहे. हा कोणताही पर्वत नाही तर पृथ्वीवरचा सर्वात मोठा खडक आहे. हा खडक 2300 फूट उंच आहे. हा खडक 100 मैल अंतरावरून दिसतो. हा दगड 1650 दशलक्ष वर्षांपूर्वीचा असल्याचं म्हटलं जातं.
पॅसिफिक महासागरातला ‘मरियाना टेंच’ हा भाग जगातला सर्वात खोल भाग असल्याचं म्हटलं जातं.
जगातल्या सात मोठय़ा समुद्रांपैकी कॅरेबियन समुद्र हा सर्वात खोल समुद्र आहे.
युद्धाच्या स्मृती जपून ठेवण्यासाठी संग्रहालयं बांधली जातात. जगातलं सर्वात मोठं युद्धसंग्रहालय म्हणजे एक रस्ता आहे. पहिल्या जागतिक महायुद्धानंतर परत येणाऱया सैनिकांना रस्ता बांधण्याचं काम देण्यात आलं. ऑस्टेलियाच्या किनारपट्टीलगत हा रस्ता बांधण्यात आला. 155 मैल लांबीचा हा रस्ता युद्धात मृत्युमुखी पडलेल्या जवानांना अर्पण करण्यात आला. त्यामुळे हा रस्ता म्हणजे जगातलं सर्वात मोठं युद्धस्मृतीस्थळ बनून गेला.