बेळगाव
राज्यात अनेक ठिकाणी कोरोना लसीकरणास प्रारंभ करण्यात आला आहे. येथील जिल्हा रुग्णालयात कोविडची लस उपलब्ध झाल्यानंतर आता अशोकनगर येथील ईएसआय इस्पितळातही सोमवारी कोविड लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. यावेळी मुख्य वैद्याधिकारी डॉ. प्रकाश फोंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यापूर्वी 17 जानेवारी रोजी बेळगाव जिह्यातील 13 इस्पितळांमध्ये लसीकरणास उत्साहात प्रारंभ झाला होता. यावेळी 1 लाख 47 हजार कोविड लसींचे डोस बेळगावात दाखल झाले होते. आता अशोकनगर येथील ईएसआय इस्पितळातही लस उपलब्ध झाली आहे. पहिल्या टप्प्यात इस्पितळातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारीवर्गास कोविड लस देण्यात आली. याप्रसंगी डॉ. विनय बाबू, डॉ. मंजुनाथ कळसण्णावर, डॉ. रवितेज, प्रभारी मेट्रन ज्योती सागर, रेश्मा पाटील, भारती पुंडपाळ, विश्वनाथ एच. आदी उपस्थित होते.