नवी दिल्ली / वृत्तसंस्था
तीन केंद्रीय निवडणूक आयुक्तांमध्ये दुसऱया क्रमांकावर असलेले अशोक लवासा यांनी त्यागपत्र देऊन आपले पद सोडले आहे. हा निर्णय त्यांनी सोमवारी घेतला. त्यांची नियुक्ती एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या उपाध्यक्षपदी करण्यात आली आहे. या कारणास्तव आपण त्यागपत्र देत आहोत असे लवासा यांनी म्हटले आहे. 31 ऑगस्टपासून आपल्याला पदमुक्त करावे अशी विनंती त्यांनी राष्ट्रपतींनी केली आहे. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त निवृत्त झाल्यानंतर ते मुख्य आयुक्त होणार होते. मात्र त्यांनी त्यागपत्र दिल्याने हे पद रिक्त झाले आहे.