मुंबई
अवजड वाहनांच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱया अशोक लेलँडकडून आपला नवा हलका ट्रक नुकताच बाजारात लाँच करण्यात आला. हलके व्यावसायिक वाहन बडा दोस्त नावाने अशोक लेलँडने बाजारात उतरवले आहे. कंपनीने आपला बाजारातला वाटा येणाऱया 2 ते 3 वर्षात 65 टक्क्यावर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले असून सध्याला कंपनीचा वाटा 34 टक्के इतका आहे. महिंद्रा बोलेरो पिकपच्या धर्तीवर अशोक लेलँडने आपला हलका ट्रक बाजारात 7.75 लाख रुपये किंमतीला उपलब्ध केला आहे. हा नवा ट्रक मात्र अशोक लेलँडने निस्सानच्या सोबतीने बनवला आहे. चार प्रकारात ट्रक दाखल करण्यात आला आहे.