चेन्नई
ट्रक निर्मितीत कार्यरत असणाऱया अशोक लेलँड कंपनीला स्टार्टअप अंतर्गत 1400 व्यावसायिक वाहनांच्या निर्मितीची मोठी ऑर्डर मिळाली आहे.कंपनीने यासंदर्भातली योजना तयार करण्याचे काम सुरू केले असून लवकरच प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केली जाणार असल्याचे समजते. येणाऱया काळात 1400 व्यावसायिक वाहनांची निर्मिती कंपनीला करावी लागणार आहे. या ऑर्डरनंतर कंपनी आपल्या इकोमेट या वाहन निर्मितीच्या कामाला पुढच्या 5 ते 6 महिन्यांमध्ये वेग देणार आहे. व्यावसायिक वाहनांच्या बाजारपेठेत गेल्या काही वर्षांमध्ये अशोक लेलँडने आपला वाटा वाढवला आहे.