नवी दिल्ली
हिंदुजा समूहाची कंपनी अशोक लेलँडने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याला वाहनांच्या मागणीतही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घट झाली आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेने उद्योग क्षेत्रालाही अडचणीत आणले आहे. याचा फटका अशोक लेलँडला बसला आहे. अशोक लेलँडने मागणीचा अंदाज घेऊन वाहन निर्मितीत घट करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याची जी मागणी आहे ती मात्र यथावकाश पूर्ण केली जात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. मेमध्ये केवळ निर्मिती कारखान्यात 7 ते 15 दिवस काम चालणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.