मार्चअखेर 241 कोटींचा नफा : महसूलात 82 टक्के वाढ
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
व्यावसायिक वाहनांच्या क्षेत्रात कार्यरत असणारी कंपनी अशोक लेलँड यांनी 31 मार्च 2021 पर्यंतचा तिमाही अहवाल नुकताच जाहीर केला आहे. याअंतर्गत तिमाहीत कंपनीने नफ्यावर समाधान मानले आहे.
कंपनीने मार्च 2021 च्या तिमाहीत 241 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. याउलट मागच्या वषी समान कालावधीत 57 कोटी रुपयांचा तोटा कंपनीला सहन करावा लागला होता. करपश्चात नफा 314 कोटी रुपयांचा नोंदला गेला आहे. जो मागच्या वषी 72 कोटी रुपये होता. कंपनीने याच कालावधीत 7 हजार कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. जो मागच्या वषी 3 हजार 838 कोटी रुपये होता. महसुलात भरभक्कम 82 टक्के इतकी वाढ नोंदली गेली आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये मात्र कंपनीने 314 कोटीचा निव्वळ तोटा सहन केला आहे. आर्थिक वर्ष 2020 मध्ये कंपनीने 240 कोटी रुपयांचा नफा कमावला होता.