वृत्तसंस्था / मुंबई
आगामी होणाऱया 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय अश्वदौड संघाची निवड करण्याकरिता येथील महालक्ष्मी रेसकार्स मैदानावर 12 ते 16 डिसेंबर दरम्यान हौशी अश्वदौड क्लबच्या रायडर्ससाठी (शो जपिंग) निवड चाचणी घेतली जाणार आहे.
या निवड चाचणीत अश्वदौड स्पर्धेत 16 वर्षांवरील वयोगटाच्या ऍथलिट्सना परवानगी राहील. सदर निवड चाचणी अश्व़दौड स्पर्धा अखिल भारतीय अश्वदौड फेडरेशनने आयोजित केली असून या चाचणी स्पर्धेत मुंबई, दिल्ली, बेंगळूर, चेन्नई येथील स्पर्धक सहभागी होणार आहेत. सांघिक पात्रतेसाठी शो जपिंग 1.40 मी., वैयक्तिक पात्रतेसाठी शोजपिंग 1.50 मी.मध्ये चाचणी घेतली जाणार आहे.