ऑकलंड / वृत्तसंस्था
न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू ख्रिस केर्न्सला आतडय़ाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. स्वतः केर्न्सने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याची माहिती दिली. हृदयविकाराचा झटका येऊन गेल्यानंतर मागील आठवडय़ात त्याला इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला होता. एका रुटीन चेकअपमध्ये सदर कर्करोगाचे निदान झाले असून माझ्यासाठी हा मोठा धक्का होता, असे केर्न्स याप्रसंगी म्हणाला. न्यूझीलंडचा अव्वल खेळाडू राहिलेल्या ख्रिस केर्न्सने 1989 ते 2006 या कालावधीत 62 कसोटी, 215 वनडे व 2 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने 62 कसोटीत 33 च्या सरासरीने 3320 धावा जमवल्या. तसेच 29 च्या सरासरीने 218 बळी घेतले. याशिवाय, वनडेत 29.46 च्या सरासरीने 4950 धावा व 32.80 च्या सरासरीने 201 बळींचे योगदान दिले.