वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडचा माजी अष्टपैलू टीम ब्रेसनेनने सोमवारी येथे क्रिकेटच्या सर्व प्रकारातून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धेत ब्रेस्नन वॉर्विकशायर क्रिकेट क्लबकडून खेळत होता.
गेल्यावर्षीच्या एप्रिलमध्ये वॉर्विकशायर क्लबतर्फे 36 वर्षीय ब्रेस्ननला कॅप देवून गौरविण्यात आले होते. ब्रेस्ननने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये फलंदाजीत 7138 धावा तर गोलंदाजीत 575 गडी बाद केले आहेत. त्याने 9 शतके झळकविले असून 9 वेळा 5 पेक्षा अधिक गडी बाद केले आहेत. 2010 साली आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविणाऱया इंग्लंड संघामध्ये ब्रेस्ननचा समावेश होता. ब्रेस्ननने 23 कसोटीत इंग्लंडचे प्रतिनिधीत्व केले आहे.