ऑनलाईन टीम/तरुण भारत
अनेक दिवसांपासून संजय राऊत (sanjay raut) आणि ईडीचा सामना रंगला होता. अखेर ईडीने संजय राऊतांवर आज मोठी (ED Action on Sanjay Raut) कारवाई केली आहे. संजय राऊतांचे अलिबागमधील (alibag) ८ प्लॉट आणि मुंबईतील (mumbai) एका फ्लॅटवर जप्त करण्याची कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे. ईडीच्या या कारवाई नंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी असत्यमेव जयते, असं ट्विट केलं आहे.
ईडीने काही दिवसांपूर्वी संजय राऊतांच्या कुटुंबीयांची चौकशी केली होती. आता ईडीने संजय राऊतांवर थेट कारवाई करत राऊतांना मोठा झटका दिला आहे. ईडीने (ED) अलिबाग आणि मुंबई त्याठिकाणची राऊतांची मालमत्ता जप्त केली होती. १ हजार ४८ कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. राऊतांनी या घोटाळ्यातील पैसे ही मालमत्ता घेण्यासाठी वापरल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळे ईडीने चौकशीनंतर ही कारवाई केली आहे.