देसूर येथील एम.जी.ग्रुपला लावला 4 कोटी 41 लाखांचा चुना : आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडा
प्रतिनिधी /बेळगाव
देसूर येथील एम. जी. ऑटोमोबाईल बस ऍण्ड कोच प्रा. लि. मध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून काम करणाऱया कर्मचाऱयाने कंपनीला 4 कोटी 41 लाख 95 हजार 41 रुपयांचा चुना लावला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ माजली असून संशयित आरोपीला मुंबई येथून अटक करण्यात आली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता आणखी दोन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
भावय्या हरेन देसाई (रा. कांदिवली-मुंबई) असे त्या संशयित आरोपीचे नाव आहे. भावय्या हा देसूर येथील एम. जी. ऑटोमोबाईल बस ऍण्ड कोच येथे असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून काम पाहत होता. तो अनेकांची बिले देत होता. सर्व जमा-खर्च तोच करत होता. बँक खाते तसेच सर्व ऑनलाईनचे पासवर्ड त्याच्याकडे होते. मात्र त्याने काही दिवसांपूर्वी या बँक खात्यातून अनेकांच्या नावे रक्कम उचलली. ही घटना काही दिवसांनंतर उघडकीस आली.
भावय्याने याठिकाणी काम करत असताना कंपनीच्या वरि÷ अधिकाऱयांचा विश्वास संपादन केला होता. त्यामुळे त्याच्यावर लवकर संशय आला नाही. तो सुटी घेऊन मुंबईला गेला होता. त्यानंतर तो परदेशात जाण्याच्या तयारीत असताना त्याला पोलिसांनी विमानतळावरूनच अटक केली होती.
तब्बल 4 कोटी 41 लाख 95 हजार रुपयांची ही फसवणूक झाली आहे. त्यामुळे सारेच खडबडून जागे झाले. त्यानंतर तातडीने बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये दि. 12 मार्च 2022 रोजी कंपनीमार्फत प्रकाश चुन्नाप्पा सरवी यांनी फिर्याद दिली आहे.
मात्र हा ऑनलाईन व्यवहार झाल्याने बेळगाव ग्रामीण पोलिसांनी हे प्रकरण सीईएन विभागाकडे सोपविले. सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी गेल्या आठ दिवसांपासून या प्रकरणाचा तपास सुरू केला व त्याला अटक केली आहे.
भावय्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. यावेळी त्याने आपल्याच नातेवाईकांच्या बँक खात्यावर रक्कम वर्ग केल्याचे आढळून आले. ज्या व्यक्तींच्या बँक खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये उर्जा शैलेश शहा (रा. कांदिवली-मुंबई), हरण विनोदराज देसाई (रा. कांदिवली-मुंबई), श्री टेडर्स, अंधेरी ईस्ट, मुंबई), अल्ट्राट्रेडींग कंपनी, डोंबिवली ईस्ट, मुंबई), स्वस्तिक इंटरप्रायझेस (न्यू दिल्ली), जलाराम कार्पोरेशन (कोलकाता-पश्चिम बंगाल) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्वांवर भा.दं.वि 465, 466, 467, 468, 471, 406, 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी भावय्या हरेन देसाई याच्याकडून 2 कोटी 66 लाख रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. आता उर्वरित रकमेसाठी त्याची चौकशी करण्यात येणार आहे. मंगळवारी जेएमएफसी तृतीय न्यायालयात त्याला हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी वकिलांनी त्याची चौकशी करणे गरजेचे असून आणखी आठ दिवस त्याला पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली. मात्र न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे. या घटनेने औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.