नवी दिल्ली
असुस कंपनीला येणाऱया काळात व्यावसायिक कॉम्प्युटर्सच्या बाजारपेठेत आपला 5 टक्के इतका वाटा काबीज करायचा आहे. तैवानच्या या कंपनीने यासंबंधीची योजना आखली असून येणाऱया काळात उत्पादनांच्या विकास, विपणन आणि विक्रीकरता आवश्यक ते प्रयत्न केले जाणार आहेत. या करता कंपनी गुंतवणूक करण्याचा विचार करते आहे. भारतीय बाजारात या महिन्यात कंपनी आपला नवा पर्सनल कॉम्प्युटर दाखल करू इच्छिते. वर्षापूर्वी कॉम्प्युटरच्या क्षेत्रात उतरलेल्या असुसला भारताची 5 टक्के इतकी बाजारपेठ काबीज करायची आहे. या योजनेकरता असूसकडून भारतातले व्यवसाय प्रमुख दिनेश शर्मा यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. येणाऱया काळात कॉम्प्युटरच्या विक्रीकरता जोमाने प्रयत्न केले जाणार असून याकरता आवश्यक ती नव्या उमेदवारांची भरती केली जाणार आहे.