नवी दिल्ली
असुस कंपनीने आपले 6 नवे लॅपटॉप मंगळवारी बाजारात लाँच केले आहेत. नव्या लॅपटॉपच्या किमती 55 हजारापासून पुढे असणार आहेत. झेन बुक आणि विवोबुक प्रकारातील नवे लॅपटॉप कंपनीने दाखल केले आहेत. कंपनीकडून प्रिमीयम गटात झेनबुक 13 ओएलइडी लॅपटॉप 79 हजार 990 रुपयांना उपलब्ध करण्यात आला आहे. याला एएमडी रायझन 5000 यु-सिरीजचा प्रोसेसर असणार असून लॅपटॉप ऑफलाइन पद्धतीने व फ्लिपकार्टवर खरेदी करता येणार आहे. विवोबुक एस 14, विवोबुक अल्ट्रा के 14/के 15, विवोबुक फ्लीप 14, असुस विवोबुक 15 आणि विवोबुक 17 या लॅपटॉपना बाजारात सादर करण्यात आले आहे.