प्रतिनिधी / जोयडा
असू ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व असू सेवा सहकारी संघाचे नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नूतन ग्रा. पं. सदस्य यांचा सेवा सहकारी संघातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थांनी असू सेवा सहकारी संघाचे अध्यक्ष दिलीप देसाई यांच्यासह जोयडा ता. पं. उपाध्यक्ष विजय पंडित होते.
यावेळी असू ग्रा. पं. अध्यक्ष बबीता कुंभार, उपाध्यक्षा चंद्रकला कुंभार, असू सेवा सहकारी संघाचे नूतन अध्यक्ष सुनील कुंभार, उपाध्यक्ष गणेश गावडा, ता. पं. उपाध्यक्ष विजय पंडित व दिलीप देसाई यांचा व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जोयडा ता. पं. उपाध्यक्ष विजय पंडित म्हणाले, नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यापूर्वीच्या अध्यक्षांनी अडीच वर्षे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यांचा कालावधी संपल्याने पुढील कालावधीसाठी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड झाली आहे. मागील अध्यक्ष दिलीप देसाई यांनी आपल्या कालावधीत उत्तम काम करत शेतकऱयांना सहकार्य केले. तसेच काम नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी करावे, असे मत व्यक्त केले. यावेळी मारुती पाटील, लक्ष्मी चांभार, महादेव कापोलकर, चंद्रकांत गावडे, वासू गावडा, नारायण चांभार, गंगुबाई गावडे, दिलीप देसाई व नेरवी यांचाही सत्कार करण्यात आला.