बेळगाव : असोगा (ता. खानापूर) येथे बाग परिवारातर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कविता वाचनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी कवी, कवयित्रींनी येथील निसर्गरम्य वातावरणात एकापेक्षा एक सुंदर अशा कविता सादर केल्या. येथील मलप्रभा नदीतीरावरील शिवलिंग देवस्थानच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला. यावेळी 16 हून अधिक कवींनी सहभागी होत बहुभाषिक काव्य सादरीकरण केले. यावेळी विजया उरणकर, स्मिता किल्लेकर, प्रा. मनीषा नाडगौडा, अर्पणा पाटील, अस्मिता आळतेकर, डॉ. मेघा भंडारी, विश्वनाथ मुरगोडी, भरत गावडे, चंद्रशेखर गायकवाड, परशुराम कामती, बालकवी प्रांजल, भाविका भंडारी यांनी कविता सादर केल्या. डॉ. सुकिर्त भंडारी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन दिलीप सावंत यांनी केले. दीपक किल्लेकर यांनी आभार मानले.
Previous Articleकोल्हापूर हायकर्सच्या मावळ्यांनी सर केला आव्हानात्मक लिंगाणा
Next Article बसवणकुडची येथील ट्रस्टच्या अध्यक्षपदी लक्ष्मण कोळुचे
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.