निकोला मॅक्युरा दर आठवडय़ाला सैन्याच्या जंकयार्डमध्ये जातात आणि तेथून काही ना काही उचलून आणतात. हे काम ते केवळ संगीतावरील प्रेमापोटी करत असतात. तेथे धूळ खात पडत असलेल्या रायफल्स, शिरस्त्राण, अन्य अस्त्रांचा ते शोध घेतात.
मॅक्युरा यानंतर स्वतःच्या कामाचे साहित्य स्टुडियोत आणतात. युद्धात वापरण्यात आलेल्या सामग्रीपासूनच ते सांगितिक वाद्यांची निर्मिती करतात. ते बझुका आणि कनस्तरपासूनही सेलोसारखे सांगितिक वाद्य तयार करतात. एका एम70 रायफलद्वारेही त्यांनी गिटार तयार केली तर सैन्य शिरस्त्राणाला त्यांनी रॉकस्टारची अनुभूती देणाऱया हेल्मेटच्या रुपात डिझाइन केले. प्रथमोपचार किट आणि असॉल्ट रायफलमधून त्यांनी वायलिनची निर्मिती केली आहे.
विनाकारण बंदुकांमध्ये जगतोय
बंदुका आमच्या चहुबाजूला आहेत. त्यांनी आम्हाला घेरले आहे, हे आम्ही कधीच पाहिले नसल्याचे उद्गार मक्युरा यांनी काढले आहेत. नोवी सॅड अकॅडमी ऑफ आर्ट्समध्ये ते सहाय्यक प्राध्यापक आहेत. युद्धात भाग घेतलेल्या लोकांनी स्वतःच्या अस्त्रांपासून संगीताची निर्मिती करावी, याकरता मदत करण्याची माझी तयारी असल्याचे ते सांगतात. रायफलद्वारे एखादे सांगितिक वाद्य तयार केल्यारव बंदुकीचे अस्तित्व पूर्णपणे संपत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रणगाडय़ाला बदलण्याचे स्वप्न निकोला स्वतःच्या पुढील प्रकल्पात सैन्य रणगाडय़ाला बदलू इच्छितात. ते रणगाडय़ाच्या मदतीने 5 संगीतकार एकाचवेळी वाजवू शकतील अशाप्रकारचे वाद्य तयार करू इच्छित आहेत. शर्दजान सारोविक व्हिज्युअल आर्टिस्ट आहे. त्यांनी मॅक्युरा यांच्याकडून निर्मित वाद्यांचा वापर करून पाहिला आहे.