प्रतिनिधी / म्हापसा
शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी अस्नोडा शाखेत नुकताच शिक्षक सत्कार सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकमान्य मल्टिपर्पजचे म्हापसा क्षेत्रीय प्रबंधक कुमार प्रियोळकर उपस्थित होते.
अस्नोडा परिसरातील एकूण 17 शिक्षक या सोहळय़ात सहभागी झाले होते. शिक्षक व मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन झाले. शाखा प्रंबधक मुरारी पालकर व सौ. सोनल कुबल यांनी शिक्षकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. व सभेचे उद्दीष्ठ स्पष्ट केले. कर्मचारी कु. स्टेफी कुतीन्हो यांनी लोकमान्यच्या विविध योजनांची माहिती दिली. डॉ. गोविंद काळे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. शिक्षक बाबुसो गावकर (शिरगाव), श्रीधर कामत (शिरसई), विठ्ठल पाटील (कैलासनगर), स्मिता प्रभूदेसाई(अस्नोडा), बजरंग शिंदे (अस्नोडा) व श्रेया केळकर (नानोडा) यांनी आपले विचार मांडले व संस्थेने एक विश्वासू पतसंस्था म्हणून गोव्यात नाव कमविले असे स्पष्ट केले. तत्पर कर्मचारी सेवेचा पण आवर्जून उल्लेख करण्यात आला. सांखळी येथे असाच कार्यक्रम शिक्षकांसाठी आयोजित केला होता. तसेच हळदीकुंकू, वाढदिवस असे विविध कार्यक्रम करून ग्राहकांमध्ये सलोखा निर्माण होत आहे. यावेळी शाखेतर्फे उपस्थित शिक्षकांना लोकमान्य टिळक यांचा फोटो व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे म्हापसा येथील सहाय्यक क्षेत्रीय प्रबंधक अँथनी अझावेदो यांनी विचार मांडले. अधिकारी चंद्रकांत पै, गायत्री नाईक, केतन कारापूरकर, योगेश शेटय़े उपस्थित होते. ज्येष्ठ प्रबंधक सिताराम काळे यांनी सूत्रसंचालन तर शाखा कर्मचारी आशू कळंगुटकर यंनी आभार मानले. शिक्षकांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.