क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
अस्मिता एन्टरप्रायझेसतर्फे दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी, चित्रकला व निबंध स्पर्धां घेण्यात आल्या. या स्पर्धेतील सर्व विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धां रामनाथ मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. रांगोळी स्पर्धेत पाचवी ते सातवी गटात 1) सपना जाधव, 2) नम्रता माधव, 3) स्वाती अनगोळकर.
आठवी ते दहावी गट- 1) प्रज्वल बंकी, 2) तेजस्वीनी लोहार, 3) ऋतुजा लोहार.
रांगोळी खुला गट –1) सौजन्या बनसोडे, 2) सुषमा बनसोडे, 3) पूजा जाधव.
चित्रकला स्पर्धा –पहिली ते चौथी गट -1) असावरी कुंभार, 2) कृष्णा गौंडाडकर, 3) कुलदीप मजुकर.
पाचवी ते सातवी गट- 1) मानसी गेंजी, 2) वैभवी बडमंजी, 3) सर्वेश रेवणकर. 8 वी ते 10 वी गट – 1) यश पाटील, 2) निहार मजुकर, 3) दत्तगुरू धुरी.
निबंध स्पर्धा –5 वी ते 7 वी गट -1) शुभांगी लोहार, 2) श्रावणी हलगेकर, 3) जयश्री लोहार. 8 वी ते 10 वी गट -रोशनी कित्तुरकर, 2) रिया सोमाजीचे, 3) जयदीप नाडकर्णी.
हस्ताक्षर स्पर्धा 5 वी ते 7 वी गट- 1) श्रावणी सोमनाथ हलगेकर, 2) वैभवी बडमंजी, 3) यश दिनेश पाटील. 8 वी ते 10 गट-1 रोशनी कित्तूरकर, 2) रोशनी तारिहाळकर, 3) प्रिया कोलेकर यांनी विजेतेपद पटकाविले. विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुणे ऍड. करूणा रेवणकर, श्रृतीका हलगेकर, आयएसआय चिन्नस्वामी, अस्मिता एंटरप्रायझेसचे राजेश लोहार, अतित बेलेकर, सुनिल पवार, सोमनाथ हलगेकर, अनंत लंगरकांडे आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी अमित लोहार, मारूती लोहार, सुमित सुतार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार विकी ताशिलदार यांनी केले.