वार्ताहर / म्हासुर्ली
म्हासुर्ली पैकी अस्वलवाडी (ता राधानगरी) येथे आज सकाळी शेतातील झाडे तोडण्याच्या कारणावरून झालेल्या तुंबळ मारामारीत दोन सख्खे भाऊ जखमी झाले असून चार चुलत भावांच्या विरोधात राधानगरी पोलिसात मारहाणीचा गुन्हा नोंद झाला आहे. या मध्ये सखाराम तुकाराम अस्वले ( वय ४८ ), बाळू तुकाराम अस्वले ( वय ४६ ) जखमी झाले आहेत. अधिक तपास राधानगरी पोलीस करत आहेत.