अनेक दिवस राहिले एकत्र
मानवी जीवन हे भावनांनी भरलेले असते. याचप्रकारे प्राणी देखील जगत असतात. त्यांनाही मित्र असतात अन् शत्रुत्वही असते. ते देखील प्रेम करत असावेत. अशा अनेक कथा आहेत, ज्या जंगलाला ओळखणारे लोक तुम्हाला सांगू शकतील. अशीच एक कथा आहे लांडगा आणि अस्वलाची. दोघांमध्येही घट्ट मैत्री होती आणि दोघेही एकत्र शिकार करायचे, दोघेही अनेकदा एकत्र बागडताना दिसून आले आहेत.
फिनलंडचा छायाचित्रकार लास्सी रॉटियनियनने या दोघांची कहाणी जगासमोर आणली आहे. मादी लांडगा आणि अस्वलाला अनेकदा एकत्र शिकारत करताना पाहिल्याचे लास्सी यांनी सांगितले. लांडगा आणि अस्वल यांचे फारसं जमत नसल्याचे मानले जाते. अस्वल जेव्हा शिकार करते तेव्हा लांडग्यांचा कळप त्याची शिकार हिसकावण्याचा प्रयत्न करत असतात.
दोघेही होते एकाकी
हे दोघेही एकत्र येण्यामागे त्यांचा एकाकीपणा कारणीभूत असावा. याचमुळे दोघेही सोबत दिसून यायचे असे लास्सी यांनी सांगितले. लास्सी यांनी या दोघांची सुंदर मैत्री 10 दिवसांपर्यंत पाहिली. ते दिवसभर एकत्रच असायचे. यादरम्यान लास्सी यांनी त्यांना फॉलो करत त्यांची छायाचित्रे जगासमोर शेअर केली. मैत्री तर प्राणीही करतात, फक्त पाहणारे लोक आणि टिपणारे कॅमेरे असावेत.