नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना अस्वस्थ वाटू लागल्याने आज सकाळी दिल्लीमधील आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. या ठिकाणी त्यांची तपासणी सुरू आहे.
छातीत दुखत असल्याने, नियमीत तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.