हैदराबाद/ वृत्तसंस्था
प्राईम व्हॉलीबॉल लीग स्पर्धेत अहमदाबाद डिफेंडर्सने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यात अहमदाबाद संघाने हैदराबाद ब्लॅक हॉक्सचा 3-1 असा पराभव केला.
या सामन्यात अहमदाबाद संघातील बचाव फळीत खेळणाऱया जॉनने दर्जेदार कामगिरी केली. अहमदाबाद डिफेंडर्सने हा सामना 15-13, 15-12, 9-15, 15-12 असा जिंकत अंतिम फेरीत स्थान मिळविले. आता कोलकाता थंडरबोल्ट्स आणि कालिकत हिरोज यांच्यातील विजयी संघाबरोबर रविवारी अहमदाबाद डिफेंडर्सचा अंतिम सामना होणार आहे. या सामन्यात अहमदाबाद संघातील शॉन टी. जॉनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.