अहमदाबाद / वृत्तसंस्था
आयपीएल फ्रॅंचायझी अहमदाबादने गुजरात टायटन्स हे आपल्या संघाचे नाव असेल, अशी घोषणा बुधवारी केली. जागतिक स्तरावरील सर्वात मोठे स्टेडियम अहमदाबादमध्येच आहे आणि गुजरातमध्ये ठासून भरलेली उर्जा दाखवून देण्यासाठी हे नाव निवडले असल्याचे यावेळी व्यवस्थापनाने नमूद केले. आयपीएलच्या 15 व्या आवृत्तीत पदार्पण करण्यापूर्वी गुजरात टायटन्सचा संघ मेगा ऑक्शनसाठी सज्ज आहे. तूर्तास, या संघाने हार्दिक पंडय़ा (15 कोटी), रशिद खान (15 कोटी) व शुभमन गिल (8 कोटी) या तीन खेळाडूंना लिलावापूर्वी करारबद्ध केले आहे. विक्रम सोळंकी संघाचे संचालक असतील तर हार्दिक पंडय़ाकडे नेतृत्वाची धुरा असेल.
याशिवाय, गॅरी कर्स्टन फलंदाजी प्रशिक्षक तर आशिष नेहराची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यंदाचा आयपीएल लिलाव दि. 12 व 13 फेब्रुवारी रोजी होत असून शनिवारी पहिल्या दिवशी सकाळी 11 वाजता लिलाव प्रक्रियेला सुरुवात होईल.