कोल्हापूर/प्रतिनिधी
गेल्या काही निवडणुकांमध्ये हसन मुश्रीफ (hasan mushrif) म्हणाले होते की, दिवाळीत थेट पाईपलाईनच्या पाण्याने अंघोळ घालेन. पण अहो मुश्रीफ साहेब ! थेट पाईपलाईनचे पाणी पिण्यासाठी आहे, अंघोळीसाठी नव्हे. असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( chandrakant patil) यांनी लगावला. कोल्हापुरातील (kolhapur) पत्रकार परिषदेत बोलत होते.
३ लाख कार्यकर्त्यांवरून टीका टिप्पणी सुरू आहे. पण मुश्रीफ यांनी देखील सुद्धा 25 हजार कार्यकर्ते दाखल होतील असे म्हणाले. मात्र आमचे तीन लाख कार्यकर्ते युक्रेनला पाठवा, असे तुम्ही म्हणाला. पण तुमची 25 हजाराची टीम अगोदर युक्रेनला पाठवा, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांना लगावला.
मंत्री हसन मुश्रीफ हे वारंवार भाजपवर टीका करत होते. मात्र सध्या ते जास्त भाजपवर बोलत नाहीत. असा प्रश्न पत्रकारांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना केला असता चंद्रकांत पाटील यांनी, खरा पत्रकार तोच असतो जो शरीराच्या हावभावावरून समजून जातो. त्यामुळे मुश्रीफ यांची बॉडी लँग्वेज खूप काही सांगून जाते, असं पाटील म्हणाले.