नवी दिल्ली / ऑंनलाईन टिम
केंद्र सरकारने अॅटर्नी जनरल जनरल के के वेणुगोपाल यांचा कार्यकाल एक वर्षासाठी 30 जून 2022 पर्यंत वाढवला आहे. उद्या, मंगळवार दि. 29 जून 2021 रोजी वेणुगोपाल यांचा तीन वर्षांचा कार्यकाल संपणार होता. तत्पुर्वी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. वेणुगोपाल यांच्या पुर्ननियुक्तीला 28 जून रोजी झालेल्या कॅबिनेट समितीच्या बैठकीत हिरवा कंदील दाखवण्यात आला.
वेणुगोपाल यांनी या पुर्वी अनेक सरकारी यंत्रणेचे वकील म्हणून कामकाज पाहिले आहे. टुजी स्पेक्ट्रम घोटाळा, राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग कायद्याबाबतच्या सुनावणी यासारख्या न्यायालयीन प्रक्रियेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
यापुर्वीचे मुकुल रोहतगी यांनी व्यक्तीगत कारणासाठी राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांच्या जागी के के वेणुगोपाल यांची वर्णी लागली होती. 2019 रोजी नरेंद्र मोदी सरकार यांच्या कार्यकालात दुसऱ्यांदा त्यांची नियुक्ती झाली होती.