नवी दिल्ली
इलेक्ट्रॉनिक निर्मिती सेवेत असणारी कंपनी अॅव्हलॉन टेक्नॉलॉजी यांचा लवकरच आयपीओ सादर होणार आहे. सदरचा आयपीओ पुढील आठवड्यात सोमवार 3 एप्रिलला खुला होणार असून 6 एप्रिल रोजी बंद होणार असल्याची माहिती आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी 31 मार्चपासून बोली लावता येणार आहे. यात 320 कोटी रुपयांचे ताजे इक्विटी समभाग सादर केले जातील व ऑफर फॉर सेलअंतर्गत 545 कोटी रुपयांचे समभाग प्रवर्तक व समभागधारकांकडून सादर केले जातील.