प्रतिनिधी /पणजी
गोमंतक साहित्य सेवक मंडळ आणि इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा (आयएमबी) यांच्या संयुक्त विद्यमाने पाहिले अखिल गोवा मराठी पत्रकार संमेलन शनिवार 9 रोजी सकाळी 9.30 वाजता आयएमबी सभागृहात भरविण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोवा विधानसभेचे सभापती रमेश तळवडकर उपस्थित राहणार आहेत.प्रमुख वक्ते ज्ये÷ पत्रकार जयंत संभाजी यांचे ’मराठी पत्रकारितेतील त्रुटी आणि सुधारणेस वाव’ या विषयावर भाषण होईल.
मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावलेले पत्रकार सागर जावडेकर, परेश प्रभू, अवित बगळी व किशोर नाईक गावकर यांचा गोमंतक साहित्य सेवक मंडळ सत्कार करणार आहे. दुसऱया सत्रात गोवा शासनाचे माहिती आयुक्त संजय ढवळीकर यांचे,’वार्ता?कन, वृत्तसंपादन, पुरवणी संपादन, ले आऊट डिझायनिंगचे भान,करिअर’ या विषयावर भाषण होईल.आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. गुरुदास नाटेकर, मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर,आयएमबीचे अध्यक्ष दशरथ परब,समितीचे सचिव किसन फडते, उपाध्यक्ष अजितसिंह राणे यांच्या उपस्थितीत संमेलनाचे उदघाटन होईल.
पत्रकार परिषदेत डॉ. गुरुदास नाटेकर यानी बुधवारी संमेलनाचा कार्यक्रम जाहीर केला. यावेळी वरील पदाधिकारी तसेंच मंडळाचे उपाध्यक्ष विट्ठल गावस,कार्यवाह सुहास बेळेकर चित्रा क्षीरसागर,कार्यकारी सदस्य पौर्णिमा देसाई, प्रकाश तळवडेकर उपस्थित होते. अजितसिंह राणे यांनी सांगितले की, या संमेलनात ग्रामीण पत्रकारांवर जास्त भर देण्यात येईल. त्यांना मार्गदर्शन लाभणार आहे.