क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
बेंडवाडा- सांगे येथील सनशाईन क्रिकेटर्सने आयोजित केलेल्या अखिल भारतीय पातळीवरील भव्य रकमेच्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत रायगडच्या सार्थक इलेव्हन आणि डोंबिवलीच्या दिपद दादा प्रतिष्ठानने स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेतील सामने सांगे येथील शासकीय मैदानावर करण्यात येत आहे.
संक्षिप्त धावफलकः सार्थक इलेव्हन, 4 षटकात 2 बाद 27 (सुमीत डोंगरे 10, जिवीत म्हात्रे 8 धावा. सचिन व कमलेश पाटील प्रत्येकी एक बळी) पराभूत विरूद्ध दिपक दादा प्रतिष्ठान, 2.2 षटकात 2 बाद 28 (करण ढोले 20 धावा. प्रज्योत अंभिरे व प्रीतम बारी प्रत्येकी एक बळी). सामनावीर- करण ढोले (दिपक दादा प्रतिष्ठान).
दिपक दादा प्रतिष्ठान, 2 षटकात नाबाद 31 धावा विजयी विरूद्ध अमेझिंग, 2 षटकात 2 बाद 17 धावा. संदीप मकवाना 15 धावा. प्रसन्न पाटील 2-2. सामनावीर- केतन म्हात्रे (दिपक दादा प्रतिष्ठान).
झगदंबा, 5 षटकात 6 बाद 59 (अब्दुल सलाम 14, अर्जुन भोसले 13, भुषण पाटील 10 धावा. शहनवाज खान 2-10, राकेश प्रभू व प्रज्योत अंभिरे प्रत्येकी एक बळी) टाय विरूद्ध सार्थक इलेव्हन, 5 षटकात 5 बाद 59 (सुमीत डोंगरे 28, संदीप पाटील 13 धावा. विकी भोईर, मुख्तार कद्री व विनोद विल्सन प्रत्येकी एक बळी). सामनावीर- सुमीत डोंगरे (सार्थक इलेव्हन).
सार्थक इलेव्हन, 5 षटकात 3 बाद 66 (रजत मुंडे 19, सुमीत डोंगरे 17, श्रेयश कदम 16 धावा. अंकुश भामडकर व बबलू मुंग्रे प्रत्येकी एक बळी) विजयी विरूद्ध अमेझिंग, 5 षटकात 5 बाद 28 (दर्शन बांदेकर 12 धावा. राकेश प्रभू 2-3, प्रज्योत अंभिरे व निखिल बागुल प्रत्येकी एक बळी). सामनावीर – रजत मुंडे (सार्थक इलेव्हन).
आजचे लीग सामने- राम वॉरियर्स म्हापसा, पलोकर फायटर्स रायगड, एफ. एम. इलेव्हन कर्नाटक, जॉफ बॉईज माडेल व मांडवी परिवार काणकोण.