‘घरी राहूनच भक्ती करावी!’ : अन्य ठिकाणच्या शिवरात्रोत्सवावरही निर्बंध
- फक्त धार्मिक विधी पार पडण्यास परवानगी – जिल्हाधिकारी
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात सर्वात मोठय़ा प्रमाणात भरणाऱया आंगणेवाडी व कुणकेश्वर यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच संपूर्ण जिल्हय़ात महाशिवरात्री उत्सवावर निर्बंध घालण्यात आले आहेत. गर्दी टाळण्यासाठी स्थानिक स्तरावरील मोजक्मयाच लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडण्याची परवानगी दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. नागरिकांनी गर्दी टाळण्यासाठी घरीच थांबून भक्ती करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर उपस्थित होते.
आंगणेवाडी भराडी देवीचा यात्रोत्सव 6 मार्चला, तर कुणकेश्वरचा यात्रोत्सव 11 मार्चला होत आहे. दोन्ही यात्रांना मोठी गर्दी असते. परंतु यावषी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. आपण स्वतः दोन्ही ठिकाणी भेटी देऊन स्थानिक नागरिकांना तशा सूचना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली.
कोरोनाच्या महामारीमुळे यात्रोत्सवावर बंदी घालण्यात आली आहे. फक्त स्थानिक लोकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. त्यावेळी सुद्धा गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. आंगणेवाडीमध्ये फक्त आंगणे कुटुंबासाठीच पास दिले जाणार आहेत. बाहेरच्या एकाही व्यक्तीला तिथे जाता येणार नाही. आंगणे कुटुंबियांपैकीही एकावेळी 50 पेक्षा जास्त व्यक्तीना मंदिरात जाता येणार नाही, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या.
प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये ईश्वराबद्दल श्रद्धा आहे. परंतु कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी घरीच थांबून भक्ती करावी. कुणकेश्वर यात्रोत्सव सुद्धा रद्द केला असून मोजक्मया लोकांच्या उपस्थितीमध्ये धार्मिक विधी पार पाडण्यासाठी परवानगी दिली आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाल्या.
11 मार्चला महाशिवरात्री उत्सव आहे. जिल्हय़ात इतर ठिकाणीही हा उत्सव साजरा केला जातो. परंतु त्या ठिकाणीही निर्बंध घातले असून त्या ठिकाणीही गर्दी करता येणार नाही. धार्मिक विधीच करता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरीच थांबून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.
पोलीस यंत्रणा सतर्क – पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे
आंगणेवाडी व कुणकेश्वर यात्रोत्सवावर बंदी घालूनही जर कुणी आले, तर त्यांना प्रवेश दिला जाणार नाही. मंदिराकडे जाणाऱया सर्व मार्गांवर पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. आंगणे कुटुंबातील व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे. पोलीस चेकनाक्मयावरही तपासणी केली जाणार आहे. जिल्हय़ात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रशासन सतर्क असून जनतेनेही सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केले आहे.
यात्रोत्सवाला मुंबईहूनही मोठय़ा प्रमाणात लोक येतात. त्यामुळे स्थानिक लोकांनी त्यांना येऊ नये, असे कळवावे. गर्दी होऊ नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे ‘माझी जबाबदारी’ ओळखून कोविड नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.