तरुण भारत इफेक्ट
मौजेदापोली / वार्ताहर
दापोली तालुक्यातील आंजर्ले येथून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी साठवणूक करून ठेवण्यात आलेली 1 ब्रास वाळू नुकतीच जप्त केली. याबाबत तरुण भारतने वृत्त प्रसिद्ध केले होते.
दापोली तहसिलदार कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आंजर्लेचे मंडळ अधिकारी व्ही. एच. धाडवे व तलाठी यु. व्ही. पाटील हे पाहणी करत असताना त्यांना अर्धा अर्धा अशी एकूण एक ब्रास वाळू निदर्शनास आली. त्यांनी या वाळूची चौकशी केली असता नरेंद्र जोशी व स्वप्निल पाटील यांची असल्याचे समोर आले. यामुळे संबंधितांवर दापोली तहसिलदार कार्यालयाने वाळू जप्त करून कारवाई केली आहे.