कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा विस्कळीत : प्रवाशांची गैरसोय, दोन्ही परिवहन मंडळांना फटका
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव विभागाला सर्वाधिक महसूल मिळवून देणारी कर्नाटक-महाराष्ट्र ही आंतरराज्य बससेवा तुरळक प्रमाणात सुरू आहे. कर्नाटकात धावणारी महाराष्ट्राची लालपरी मागील काही महिन्यांपासून ठप्प झाली आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या महसुलावर मोठा परिणाम झाला आहे. सीमाहद्दीवर कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आल्याने ही आंतरराज्य बससेवा कोलमडली आहे.
अनलॉकच्या शिथिलतेनंतर राज्यांतर्गत बससेवा सुरळीत सुरू झाली आहे. मात्र, आंतरराज्य बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. दरम्यान, सीमाहद्दीवर कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आल्याने बेळगाव जिल्हय़ातील आगारांना मोठा फटका बसला आहे. बेळगाव विभागाच्या एकूण महसुलापैकी 40 टक्के महसूल हा महाराष्ट्रात धावणाऱया बसेसच्या माध्यमातून मिळतो. मात्र, मागील दोन वर्षांपासून कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा विस्कळीत झाल्याने महसुलावरही मोठा परिणाम झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने कर्नाटकातून काही गाडय़ा महाराष्ट्रात धावत आहेत. मात्र, महाराष्ट्रातील एसटीला कर्नाटकात परवानगी नाकारली जात आहे.
कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा सुरू व्हावी, याकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, याबाबत शासनाकडून निर्णय आला नाही. कर्नाटकातून महाराष्ट्रात मोजक्मयाच बस धावत आहेत. मात्र, महाराष्ट्राची लालपरी बंदच आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे.
महाराष्ट्राच्या लालपरीची सीमाहद्दीपर्यंत धाव
महाराष्ट्राची एसटी कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीपर्यंत धावत आहे. कोल्हापूरहून येणारी एसटी कोगनोळीपर्यंत तर कोकणातून येणाऱया बसगाडय़ा शिनोळीपर्यंत (ता. चंदगड) धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना पुढील प्रवास करण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. मागील काही दिवसांपासून अशाप्रकारेच प्रवास सुरू असल्याने प्रवाशांनाही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
कर्नाटक-महाराष्ट्र प्रवास करणाऱयांची संख्या अधिक…
बेळगाव जिल्हा हा महाराष्ट्र राज्याला लागून असल्याने कर्नाटक-महाराष्ट्र असा प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या अधिक आहे. मात्र सीमहद्दीवर चेकपोस्ट नाके उभारल्याने महाराष्ट्राची एसटी मागील काही महिन्यांपासून थांबली आहे. कर्नाटकची बससेवा महाराष्ट्राच्या काही मोजक्मयाच शहरांकडे धावत आहे. कोरोनाआधी कोकणात सावंतवाडी, वेंगुर्ला, कणकवली, रत्नागिरी, राजापूर, रेड्डी आदी भागात बस धावत होत्या. त्या आता पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे कोकणातील प्रवाशांचीही मोठी गैरसोय होत आहे.
कर्नाटककडून बससेवा सुरू करण्यासाठी अद्याप परिपत्रक नाही
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात बससेवा धावत आहे. मात्र, कर्नाटक शासनाकडून बसगाडय़ा सुरू करण्यासाठी अद्याप कोणतेही परिपत्रक आले नाही. तसेच वरि÷ कार्यालयांकडून कर्नाटकात बससेवा सुरू करण्यासाठी निर्देश आले नाहीत. त्यामुळे सध्या कोकणातून महाराष्ट्रहद्दीपर्यंत म्हणजेच शिनोळीपर्यंत बसगाडय़ा धावत आहेत. कर्नाटक शासनाकडून आदेश आल्यानंतरच कर्नाटक हद्दीत बससेवा सुरू केली जाईल.
– वैभव पडोळे (आगार व्यवस्थापक-सावंतवाडी)
येत्या एक-दोन आठवडय़ात हिरवा कंदील
कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी उपायुक्तांकडे प्रस्ताव मांडला आहे. कोरोना चाचणीमुळे महाराष्ट्रात मोजक्मयाच बस धावत आहेत. मात्र, शासनाकडून निर्णय आल्यानंतर कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य बससेवा सुरू होणार आहे. येत्या एक-दोन आठवडय़ात शासनाकडून कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखविला जाईल, अशी आशा आहे.
– पी. वाय. नाईक (विभागीय नियंत्रण अधिकारी-बेळगाव)
कर्नाटकची रितसर परवानगी मिळाल्यानंतरच बस धावणार
कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीवर आरटीपीसीआरची सक्ती केल्याने प्रवाशांच्या संख्येबरोबर बससेवाही थांबली आहे. काही प्रमाणात शिथिलता दिल्यानंतर चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यात कर्नाटक हद्दीत प्रवाशांची चढ-उतार न करता प्रवासी वाहतूक सुरू आहे. कर्नाटकची रितसर परवानगी मिळाल्यानंतरच कर्नाटक हद्दीत बस धावणार आहेत. कर्नाटकने परवानगी न दिल्यानेच महाराष्ट्राची लालपरी कर्नाटकात धावताना दिसत नाही.
– रोहन पलंगे (विभागीय नियंत्रक, कोल्हापूर