ऑनलाईन टीम / पुणे :
आंतरराष्ट्रीय भारतीय नृत्य महोत्सवाचे संचालक शामहरी चक्रा, भारतीय विद्या भवन – इन्फोसिस फाऊंडेशन आयोजित सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमाअंतर्गत आंतरराष्ट्रीय भारतीय नृत्य महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला. शास्त्रिय नृत्य प्रकारापासून लोकनृत्य सादरीकरणे या महोत्सवात करण्यात आली.
महोत्सवाचा शुभारंभ ज्येष्ठ नृत्यांगना स्वाती दैठणकर, भारती विद्यापीठ स्कुल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् चे संचालक प्रा. शारंगधर साठे, प्रा.नंदकुमार काकिर्डे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाले.
भरत नाट्यम, कथ्थक, ओडिसी, कुचीपुडी, सत्तरिया, कथ्थक, हे शास्त्रीय आणि राजस्थानी, संबळपुरी हे लोकनृत्यप्रकार दोन दिवसात सादर केले गेले. विशेष दिव्यांग कलाकारांनी कथक तसेच अनेक नृत्यप्रकार सादर करून वाहवा मिळवली.
ज्येष्ठ हार्मोनियम वादक प्रमोद मराठे यांच्या हस्ते शरदिनी गोळे, प्रभाताई मराठे, माणिक अंबिके या ज्येष्ठ नृत्य गुरुंचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.