वेंगुर्ले नगरपरिषदेचा अनोखा उपक्रम
वेंगुर्ले / वार्ताहर-
वेंगूर्ला नगरपरिषद, वेंगूर्ला व ओम योगसाधनालय संचलित डॉ वसुधाज् योगा अँड फिटनेस अकॅडेमी यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी सातवा आंतरराष्ट्रीय योगदिन युट्युब व फेसबुक च्या माध्यमांच्या वापरातून साजरा केला जाणार आहे. यात असंख्य नागरिकांनी आपल्या घरातून सहभागी व्हावे. असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप व
योग्य शिक्षिका डाँ. वसुधा मोरे यांनी केले आहे.
संपूर्ण जग गेले वर्ष दिडवर्ष कोरोना या विश्वाव्यापी महामारीशी लढत आहे. कोरोना महामारीशी लढताना आधुनिक वैद्यकशास्त्र -होमिओपॅथी-आयुर्वेद याचबरोबर योगशास्त्राची अतिशय मोलाची जोड आपल्याला लाभली आहे. योगशास्त्र आपल्याला रोगप्रतिकारशक्ती -शारीरिक शक्ती, मनोबल-आत्मबल-भावनिक बल देत आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षी ही आपण कोरोना च्या पार्श्वभूमीवर हा योगदिन ऑनलाईन साजरा करत आहोत. सदर कार्यक्रमात डॉ वसुधाज् योगा अँड फिटनेस अकॅडेमी मार्फत योग प्रशिक्षण आयोजित केले आहे, त्याचे थेट प्रक्षेपण वेंगुर्ला नगरपालिकेच्या अधिकृत YouTube चॅनेल वरून करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी “Be with Yoga …..Be at Home” या युक्ती प्रमाणे आपापल्या घरी थांबून याहीवर्षी सोमवार दि. २१ जून रोजी सकाळी ७ वाजता खालील लिंक द्वारे सहभागी होऊन प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा
स्वच्छ वेंगुर्ला सुंदर वेंगुर्ला, माझा वेंगुर्ला समृद्ध वेंगुर्ला
“Be With Yoga –Be at Home”
YouTube live लिंक
https://youtu.be/GoYHl0EccAE
Facebook Live लिंक
https://fb.me/e/ALeK0zvw