प्रतिनिधी/ रत्नागिरी
आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेमध्ये रत्नागिरीच्या सायली साने हिने प्रथम क्रमांक पटकावला आह़े सहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाकडून आंतरराष्ट्रीय ‘माय लाईफ माय योगा’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होत़े सायली हिने अमेरिकेतील 18 वर्षावरील महिलांच्या गटात सहभाग घेत प्रथम क्रमांक पटकावल़ा
ऑनलाईन घेण्यात आलेल्या या स्पर्धेत योगा कसा करावा, त्याचे प्रात्येक्षिक व होणारे फायदे याचे वर्णन करणारा व्हिडीओ अपलोड करावयाचा होत़ा यामध्ये सायली †िहने प्रथम क्रमांक पटकावल़ा सायली ही रत्नागिरी येथील रहिवासी आह़े रत्नागिरीतील पतंजली योगशिक्षक विजय साने व निता साने यांची ती मुलगी आह़े जीजीपीएस, अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय व फिनोलेक्स अपॅडमीची माजी विद्यार्थीनी आह़े अमेरिकेमध्ये कॉम्प्युटर सायन्समध्ये एमए केले आहे. त्याठिकणीच ती नोकरीला आह़े सायली हिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे कौतुक करण्यात येत आह़े