नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने घेतला आहे. मात्र, ‘वंदे भारत मिशन’अंतर्गत सुरू असलेल्या खास विमानांना या कालावधीत उड्डाणाची परवानगी असेल. तसेच, डीजीसीएकडून परवानगी मिळालेल्या विशेष विमानांवर बंदी नसेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी 30 नोव्हेंबरपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 31 डिसेंबर 2020 पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने गुरुवारी याबाबतच्या आदेशाचे परिपत्रक जारी केले आहे.
23 मार्चपासून कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यावेळी देशांतर्गत विमानांवरही बंदी होती, पण देशांतर्गत विमानांना 25 मेपासून पुन्हा परवानगी देण्यात आली. तर, 30 नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक सुरू होण्याची शक्मयता होती, पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्यामुळे 31 डिसेंबर 2020 पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद राहणार आहे.