प्रतिनिधी /पणजी
नवी दिल्ली येथे दि. 21 ते 25 मार्च दरम्यान झालेल्या इंटरनॅशनल वॉटर कलर सोसायटीच्या तिसऱया द्विवार्षिक कार्यक्रमात गोव्याचे चित्रकार व इंटरनॅशनल वॉटरकलर सोसायटी गोवाप्रमुख कालिदास सातार्डेकर यांनी सहभाग घेतला. दरवषी होणाऱया या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील अनेक चित्रकार सहभागी होतात. या कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधीत्व करणारे वासुदेव कामत, विजय आचरेकर,बांग्लादेशचे कौसर हुसेन, इराणचे नादर मौहजाबनिया, नेपालचे एन. बी. गुरंग अशा ख्यातनाम चित्रकारांनी भाग घेतला. पाच दिवस चाललेल्या या कार्यक्रमात विविध उपक्रम जसे की आंतरराष्ट्रीय चित्रकारांची प्रात्यक्षिके, कलाचर्चा, प्रश्नोत्तर तास, मुलाखत, प्लेन एअर सत्र, पोर्टेट सत्र, चित्र प्रर्दशन इत्यादी घेतले जातात. या विविध उपक्रमात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील अनेक चित्रकार सहभाग घेतात. यावषी कालिदास सातार्डेकर यांना अशा आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांत प्रात्यक्षिके दाखविण्याचा मान मिळाला. तसेच चित्रप्रदर्शनात त्यांचे ‘वक्रतुंड’ हे चित्र प्रदर्शित करण्यात आले. ऑल इंडिया फाइन आर्ट अँड क्राफ्ट सोसायटी या आर्ट गॅलरी, दिल्ली येथे झालेल्या या प्रदर्शनात 650 पेक्षाही जास्त जगभरातील चित्रे प्रदर्शित झाली होती.
लोधी गार्डनमध्ये झालेल्या प्लेन एअर सत्रामध्येही त्यांनी भाग घेतला व त्यांना तिसऱया क्रमांकाचे पारितोषिकही मिळाले. इंटरनॅशनल वॉटर कलर सोसायटीचे संस्थापक आतानूर दोगन (तुर्की) भारतप्रमुख अमित कपूर यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.