ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानच्या बाजूने होणाऱ्या घुसखोरीचा प्रयत्न सीमा सुरक्षा दलाने रोखला. घटनास्थळावरून सुरक्षा दलाने अंमली पदार्थांची 58 पाकिटे, दोन पिस्तूलसह अन्य शस्त्रसाठा ताब्यात घेतला आहे.
सुरक्षा दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, संशयित तस्करांनी शनिवारी रात्री आरएसपुरा सेक्टरमधील अर्निया भागात अंधाराचा फायदा घेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळीबार करताच घुसखोरांनी पळ काढला.
आज सकाळी सुरक्षा दलाने घुसखोरीचा प्रयत्न झालेल्या जागेची पाहणी केली. त्यावेळी अंमली पदार्थांची 58 पाकिटे, दोन पिस्तूल, चार मॅगझीन आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.