ऑनलाईन/टीम
दिल्लीच्या हिवक्राफ्ट असोसिएट तर्फे आर्किटेक्ट विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक जगाचे अधिक चांगले ज्ञान मिळावे, त्यांच्यात असलेल्या कलेला वाव मिळावा म्हणून डिझाइन स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा लाईव्ह प्रोजेक्ट प्रकारात होती. यातील डिझाइन हरियाणातील मनोरमा शर्मा मेमोरियल एज्युकेशन ट्रस्ट साठी वापरली जाणार आहेत.
तब्बल १०० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यामध्ये सिद्धार्थ सुधर्म वाझे, अभिषेक अनंत नाईक व साकीब रियाझ मुल्ला या तिघांनी डिझाईन बनवले होते. ह्या तिघांनी एका नेक्स्ट जनरेशन शाळेचे डिझाईन बनवले. सध्या शाळा बांधणीतील असलेली जागेची आव्हाने, पालकांची, मुलांची असलेली अपेक्षा, स्कुल कॅम्पसमध्ये असलेली खेळाच्या मैदानाची गरज आदी सर्व बाबी लक्षात घेवुन हे डिझाईन बनवलेले होते. १०० स्पर्धकात या डिझाइनला तिसरे बक्षीस मिळाले.
ऑनलाईन पद्धतेने झालेल्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ सुद्धा ऑनलाईन पद्धतेने झाला. स्पर्धा परीक्षक म्हणून देशभरातील नामवंत आर्किटेक्ट संस्थांनी काम पहिले.